खेल
‘गब्बर’ धवनचा अनोखा विक्रम, उपहाराआधी शतक ठोकणारा पहिला भारतीय
- 157 Views
- June 14, 2018
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये उपहाराआधीच शतक झळकावणारा शिखर धवन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी ५ खेळाडूंना अशी करामत करता आलेली आहे, या यादीत शिखरने सहावं स्थान पटकावलं आहे. शिखरने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहारापर्यंत १५८ धावांपर्यंत मजल मारली आहे. शिखरने उपहारापर्यंत नाबाद १०४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये १९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
Share this: