देश
‘कोरोना व्हायरस’चा मोठा उद्रेक, जगभरात ३००० लोकांचा मृत्यू
- 117 Views
- March 02, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
‘कोरोना’ या जीवघेण्या विषाणूचा मोठा उद्रेक दिसून येत आहे. जगभरात नव्याने ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्ये २,९१२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच नव्या रिपोर्टनुसार आणखी ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील कोरोनो विषाणू बाधितांचा आकडा जाहीर केला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला कोरोनो व्हायरसचा संसर्ग होण्याचे कमी प्रमाण नोंदविले गेले. २०२ नवीन रुग्ण आढलेले आहेत. सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई प्रांतातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजग्य रोगाला ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे.
चीननंतर कोरोना विषाणू जगभर पसरला आहे. आता चीनमध्ये हळूहळू कमी झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. हुबेईबाहेर फक्त सहा जणांना नव्याने लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. गतवर्षी चीनमधील हुबेई येथे कोरोना व्हायरसचा प्रसार झाला. ६० हून अधिक लोकांना याची लागण झाली होती. युरोप आणि काही देशात या व्हायरसचा प्रसार झाला आहे. इटली, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातही कोरोना बाधीत लोकांच्या मृत्यूच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, ६० वर्ष वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका आहे. कारण त्यांना आधीच विकनेस असतो. ते आजाराने अशक्त असतात त्यांना या व्हायरसचा धोका आहे. सध्या जगभरात ४२ हजार ७६८ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामधील ३४ हजार ९५२ रुग्णांची प्रकृती ठीक आहे. तर ७८१६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत ३९ हजार ५१८ जणांना रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाने चीनमध्ये शुक्रवारी ४४ जणांचा मृत्यू झाला असून, ३२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियातही शुक्रवारी कोरोनाचे २३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दक्षिण कोरियात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २,०२२ वर पोहोचली. इटलीत विषाणूबाधितांची संख्या ६५० असून आतापर्यंत येथे ८ जणांचा बळी गेला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.