दुनिया
काश्मीरप्रश्नी कोणाचीच साथ न मिळाल्याने इम्रान खान यांची RSSवर आगपाखड
- 177 Views
- August 11, 2019
- By admin
- in दुनिया, समाचार
- 0 Comments
- Edit
काश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधान करताना नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये कर्फ्युची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने संविधानातील ३७० कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे या काश्मीरच्या मुद्द्याकडे लक्ष वेढण्याचा हरऐक प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.