देश
काळजी घ्या! पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ३ जणांना करोना
- 63 Views
- March 12, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
करोनाचा प्रादूर्भाव राज्यात वाढत चालला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी तीन रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. करोनाच्या पाच संशयित रुग्णांचा नुकताच चाचणी अहवाल आला असून, त्यापैकी तीन रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आतापर्यंत १४वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना विषाणूच्या पाच संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केली असता, पाचपैकी तीन रुग्णांना करोनाची लागण झाल्यानं निष्पन्न झालं आहे. उर्वरित दोन जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोघांना घरी सोडण्यात आलं आहे. तर लागण झालेल्या तीन रुग्णांना उपचारासाठी वायसीएममधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.