खेल
ऐतिहासिक! बुमराहचे टी २० मध्ये अनोखे अर्धशतक
- 221 Views
- February 25, 2019
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
पहिल्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३ गडी राखून पराभूत केले. २ षटकात १६ धावांची गरज असताना बुमराहने केवळ २ धावा देत २ बळी टिपले. पण शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना उमेश यादवने अत्यंत असमाधानकारक गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवर २ धावा काढून ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला. सामना भारताने गमावला पण जसप्रीत बुमराहने एक विक्रम केला आणि इतिहास रचला.
बुमराहने अत्यंत जबाबदारीने गोलंदाजी केली आणि ४ षटकात केवळ १६ धावा देऊन ३ बळी टिपले. बुमराहने पहिल्या टी २० सामन्यात हँड्सकॉम्बचा बळी टिपला आणि आपल्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील बळींचे अर्धशतक पूर्ण केले आणि विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या नंतर असा पराक्रम करणारा बुमराह हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. अश्विनच्या नावे ४६ सामन्यांत ५२ बळी आहेत. तर बुमराहने केवळ ४१ सामन्यांत ५१ बळी टिपले आहेत.
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२६ धावा केल्या. राहुलने दमदार पुनरागमन केले. त्याने ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले. यात त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावांची खेळी केली. तर कोहलीने १७ चेंडूत २४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने धमाकेदार अर्धशतक ठोकले. त्याने ४१ चेंडूत अर्धशतक लगावत ५ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर चौकार लगावून तो ५६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी २ चौकार आणि २ वेळा चोरट्या दुहेरी धावा मिळवत ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.