अपराध समाचार
एचआयव्हीग्रस्त महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार
- 217 Views
- January 22, 2020
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- 0 Comments
- Edit
एका २२ वर्षीय एचआयव्हीग्रस्त महिलेवर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यात दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ही सोमवारी रात्री पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये घडला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेस सोमवारी रात्री ११.५० च्या दरम्यान भबुआ रोड स्थानकात पोहोचल्यानंतर डब्यांची पाहणी करताना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना हा अत्याचार सुरू असल्याचे आढळले. या महिलेला अडवून धरलेल्या या दोन आरोपींना पोलिसांनी डब्यातच ताब्यात घेतले. दोन आरोपींपैकी एक आरोपी या महिलेवर बलात्कार करत होता, तर दुसरा आरोपी या अत्याचाराचे चित्रिकरण करत होता, अशी माहिती जीआरपीच्या जवानांनी दिली. पोलिसांनी आपल्याला रंगेहात पकडल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांपैकी एकाला पकडण्यात जवानांना यश आले. काही वेळाने दुसऱ्या आरोपीच्या मुसक्याही आवळण्यात आल्या.
ही पीडित महिला आपली वैद्यकीय तपासणीकरून पटण्याबून घरी परतत होती. त्या वेळी हे दोन आरोपी कुद्रा स्थानकात गाडीत चढले. हे स्थानक भबुआ स्थानकाआधी येते.
बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनीही पोलिसांपुढे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.
पीडित महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी भबुआ सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पीडित महिलेला तिच्या नवऱ्याने सोडून दिले होते. काही काळानंतर तिच्या नवऱ्याचा एड्स या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेला एचआयव्हीची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने सांगितले.
अत्याचार झाले तेव्हा ही महिला डब्यात एकटीच होती, असे अधिकारी म्हणाला. या एक्स्प्रेसचे भबुआ रोड हे शेवटचे स्थानक आहे. ही गाडी पटण्याहून संध्याकाळी ५.४५ वाजता सुटते.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.