खेल
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ऋषभ पंतला संधी
- 236 Views
- October 11, 2018
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
भारत विरुद्ध विंडीज या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात महेंद्रसिंग धोनी याच्यासह ऋषभ पंत यालाही संधी देण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी याच्या खेळावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे धोनीऐवजी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात येईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आज जाहीर करण्यात आलेल्या संघात धोनीला संघात कायम ठेवून ऋषभलाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, कर्णधार विराट कोहली यालादेखील या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली होती. परंतु या चर्चा फोल ठरल्या. विराट कोहली याला या मालिकेसाठी आपल्या कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर रोहित शर्मादेखील आपल्या उपकर्णधारपदी कायम आहे.याशिवाय, आशिया चषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खलील अहमद या वेगवान नवोदित गोलंदाजालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर, लोकेश राहुल.