टेक्नोलॉजी
उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
- 149 Views
- April 14, 2017
- By admin
- in टेक्नोलॉजी, समाचार
- 0 Comments
- Edit
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
हे गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर मतदारांना घर बसल्या माहिती मिळते. उमेदवारांची अपत्ये किती, संपती किती आपल्या वार्डात उभे असलेल्या उमेदवारांचे शिक्षण किती, त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत, आपल मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे. आपला वार्ड कुठला अशी संपूर्ण माहिती या अॅपवरुन नागरिकांना मिळणार आहे.
मोफत असलेल अप्लिकेशन सर्व मतदारांनी डाऊनलोड करून याचा अधिकाधिक वापर करावा, असं आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.