व्यापार
ईपीएफओ: संघटना निवडणूक आयोगाकडे जाणार
- 255 Views
- April 07, 2014
- By admin
- in व्यापार, समाचार
- 0 Comments
- Edit
सोमवार ७ एप्रिल २०१४ एक नजर (07-04-2014 : 04:05:00) नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी कपातीवेळी मूळ वेतनासोबतच अन्य भत्त्यांचाही समावेश करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात कामगार संघटनांनी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. श्रम मंत्रालयाने नुकतेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओला पत्राद्वारे यासंदर्भातील निर्णय कळविला आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर कोणतेही पाऊल उचलू नये, असे निर्देश श्रम मंत्रालयाने ईपीएफओला दिले आहेत. ईपीएफओ लवकरच याबाबत अधिसूचना काढणार आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे डी. एल. सचदेव यांनी सांगितले की, सरकारचा हा निर्णय कर्मचार्यांच्या हिताच्या विरोधात आहे. आम्ही या निर्णयाला कडाडून विरोध करू. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागू. श्रम मंत्रालयाला पत्र लिहू. सचदेव हे ईपीएफओ संघटनेचे विश्वस्तही आहेत.