खेल
इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सिंधुचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
लम्पिक रजतपदक विजेती पी. व्ही. सिंधुने ऑल इंडीया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
स्पर्धेत सहाव्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या सिंधुने बुधवारी पहिल्या फेरीत डेन्मार्कची खेळाडू मेट पाउल्सन हिचा २१-१० आणि २१-११ ने पराभव केला.
अर्ध्या तासाच्या आत तिने दुसऱ्या फेरीतील प्रवेश नक्की केला.
३३व्या क्रमांकाच्या या खेळाडूला हरवून महिला एकेरीची पहिली फेरी जिंकली.
दुसऱ्या फेरीत सिंधुचा सामना इंडोनेशियाच्या दिनार ऑस्टीनशी होईल.
त्याचसोबत पुरुष एकेरीत एच. एस. प्रणयने कायो बिनला १७-२१ ,२२-२० आणि २१-१९ ने पराभूत करून तो दुसऱ्या फेरीत पोहचला.