करियर
आयसीएसई, आयएससीचा निकाल ६ मे रोजी
- 501 Views
- April 30, 2016
- By admin
- in करियर, समाचार
- 0 Comments
- Edit
मुंबई : दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी)चा निकाल ६ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ दिवस आधी हा निकाल लागणार आहे.
कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट इक्झामिनेशन (सीआयएससीई) अंतर्गत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदा दहावीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च तर बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या कालावधीत पार पडली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. तर यंदा तब्बल १२ दिवस आधी निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांना ६ मे रोजी दुपारी ३ वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. शिवाय एसएमएसद्वारेही निकाल मिळेल.