दुनिया
अमेरिकेत पुन्हा भारतीयावर हल्ला, मायदेशी परत जाण्याची धमकी देत गोळीबार
- 201 Views
- March 05, 2017
- By admin
- in दुनिया, समाचार
- 0 Comments
- Edit
अमेरिकेत भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये ३९ वर्षीय शीख तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. तुमच्या देशात परत जा अशी धमकी देत शीख तरुणावर हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणा-या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वॉशिंग्टनमधील कँटमध्ये राहणारा ३९ वर्षीय शीख तरुण घराबाहेर गाडीचे काम करत होता. यादरम्यान एका अमेरिकन तरुणाने त्याला गाठले. चेहरा झाकलेल्या या हल्लेखोराने शीख तरुणाला तुमच्या देशात परत जा अशी धमक देत त्याच्याशी हुज्जत घातली. यानंतर हल्लेखोराने त्या तरुणावर गोळी झाडली आणि हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेत शीख तरुण जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराची ओळख अद्याप पटलेली नाही. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध सुरु आहे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
अमेरिकेत राहणा-या भारतीयावर गोळीबार केल्याची आठवडाभरातील तिसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कन्सासमध्ये भारतीय तरुणाची वंशभेदातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर गुरुवारी रात्री दक्षिण कॅरोलिनामध्ये एका भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.