अपराध समाचार
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू
- 138 Views
- March 04, 2020
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या एकच पेपर राहिलेला असताना, भिवरी येथील तलावाच्या ठिकाणी फिरण्यास गेलेल्या ११ मित्रांपैकी काल (मंगळवार) दुपारी एकाचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेश रमेश शेंडगे (वय – २२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असुन, तो दौंड तालुक्यातील मलठन येथील आहे.
प्रत्यक्षदर्शी असलेल्या कुणाल बाबर याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले, आमचा काल दुपारी ३ वाजेच्या सुमारास अभियांत्रिकीचा पेपर झाला. आता आपला उद्याचा एकच पेपर राहिला आहे, आपण भिवरी येथील तलावाच्या परिसरात जाऊ या, अस आमच्या मित्रांमध्ये ठरलं. त्यानुसार आम्ही ८ मुले आणि ३ मुली फिरण्यास निघालो. तलावाच्या ठिकाणी आम्ही साधारण ४ वाजेच्या सुमारास पोहोचलो. काही वेळाने आम्ही पोहण्यास उतरलो, सर्वजण पोहत होतो. दरम्यान साडेचार वाजेच्या सुमारास काही अंतरावर महेश बुडत असल्याचे दिसताच, मी त्याच्या जवळ जाऊन त्याला हात दिला. आम्ही थोडं अंतर पुढेही आलो मात्र काठावर पोहचण्यास काही अंतर शिल्लक असतानाच महेशला धाप लागल्याने तो बुडला. हा सर्व प्रसंग सांगत असताना, कुणालला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आम्ही अग्निशमन विभाग आणि पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. अद्यापही त्याचा शोध सुरू असल्याचेही कुणाल म्हणाला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.