अपराध समाचार
अनैतिक संबंधाच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडूनच हत्येची सुपारी
- 146 Views
- September 19, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
वसईत एका आईनं आपल्या 22 वर्षीय मुलाची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मुलाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण या महिलेला लागली होती. याच कारणामुळं या तिनं पोटच्या मुलाचीच हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
आरोपी महिलेचं नाव रजनी द्विवेदी असं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 22 वर्षीय रामचरण द्विवेदी यानं अनेक महिलांशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याच्या सर्व कृत्यांना आईवडील कंटाळले होते. यामुळं मोठी बदनामी होत असल्यानं त्यांनी त्याला वारंवार समजावलं देखील होतं. मात्र, त्यानंतर रामचरण आपल्या आईवडिलांनाच मारहाण करत होता.