VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

nobanner
नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झालेत.
टाटा टियागो गाडीतील प्रवासी सिन्नरकडून घोटीकडे जात होते. त्यावेळी घोरवड घाटामध्ये वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही कार थेट दीडशे ते दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली.
Tags
news
Share this: