देश
PM Modi Pune Visit Live Updates: पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर; महाविकास आघाडीचे ठिय्या आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी पुण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. याच दरम्यान पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक सजावट
काही वेळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर या ठिकाणी पोहचणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ मंदिराला विशेष अशी सजावट करण्यात आली आहे. यासोबत मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर शिवाजीनगर ते मंडई हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पुणे महापालिका आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे दगडूशेठ हलवाई गणपती, तिथून एस पी कॉलेज ग्राउंड आणि त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ग्राउंड असा पंतप्रधानांचा प्रवास असणार आहे. यावेळी पंतप्रधान प्रवास करणार असलेल्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.