देश
Konkan Rain News: कोकण ऑन अलर्ट! रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा, तर मुंबईसह ठाणे रायगडसाठीही ऑरेंज अलर्ट जारी
कोकणाला धुवाधार पावसाने झोडपले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस बरसला आहे. तर पुढील २४ तासांत देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरीत २५० मिमीहून अधिक पाऊस बरसला आहे. तर सिंधुदुर्गात २१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापुढील २४ तासांत देखील अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. धुवाधार पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात समुद्रामध्ये उंच लाटा उसळत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास समुद्र खवळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी मच्छीमारांना समुद्रात जाण्याची बंदी असून नागरिकांना देखील सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये देखील रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. तसेच पुढील काही तासांसाठी या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणार आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रती तास राहणार असून मुंबईसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगडात अतिवृष्टी
रायगड किल्ले परिसरात काल सायंकाळी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे प्रथमच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळ विक्राळ स्वरुपात पाणी वाहू लागल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने हे पर्यटक सुरक्षित आहेत. परंतु ही अचानक उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासन कोणतीही जीवितहानी घडू नये म्हणून सज्ज झाले आहे.

Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.