देश
Google Map वापरणं ड्रायव्हरला पडलं भारी, रस्ता चुकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी बोलावले पोलीस
विज्ञानानं इतकी प्रगती केली आहे की आता पत्ता विचारण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाची मदत लागत नाही. गुगल मॅपवर इच्छित स्थळाचं नाव टाका ते अॅप बरोबर तुम्हाला त्या पत्त्यावर कसं जायचं याचं मार्गदर्शन करेल. बरं, जर तुम्ही गाडीनं जात असाल तर तुम्हाला कमीत कमी ट्रॅफिक असलेला रस्ता देखील सांगतो. त्यामुळे गुगल मॅप ही टेक्नोलॉजी खरंच एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही असं म्हणता येईल. पण या वरदानाचं कधीकधी श्रापात देखील रुपांतर होतं. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक कुटुंब गुगल मॅपवरून शहरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतं. पण या मॅपनं त्यांना कुठे नेऊन सोडलंय ते पाहा. शेवटी या गाडीला खाली उतवरण्यासाठी पोलिसांची गरज लागली. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल.
नेमकं घडलं तरी काय?
ही घटना ऊटी जवळ निलगीरीमध्ये घडली आहे. तर त्याचं झालं असं की, एक कर्नाटकमधील कुटुंब तमिळनाडूमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं. ते गुडालूर या शहरात फिरत होते. आता त्यांना या शहरातून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे त्यांनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतला. पण हा निर्णय त्यांना चांगलाच भारी पडला. कारण गुगल मॅपला फॉलो करत करत ते एका उंच अशा टेकडीवर जाऊन पोहोचले. अन् त्यांची गाडी अशा ठिकाणी अडकली की जिथून खाली उतरणं शक्य होत नव्हंत. खाली उतरण्यासाठी केवळ पायऱ्यांचा पर्याय होता. आणि अर्थातच पायऱ्यांवरून गाडी चालवणं शक्य नव्हतं. शेवटी त्यांनी पोलिसांची आणि गावकऱ्यांच्या मदतीनं आपली गाडी खाली उतरवली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अन् या गाडीचं रेस्क्यु ऑपरेशन पाहून तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.