देश
Dhruv Rathee : महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याशी काडीचा संबंध नाही, ध्रुव राठीची संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याच्याविरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिच्याबद्दल केलेल्या सोशल मिडिया पोस्टबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ध्रुव राठी यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ध्रुव राठीनं संबंधित माध्यम संस्थेला जाब देखील विचारला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा ध्रुव राठी पॅरडी अकाऊंटवर केलेला आहे. या सोशल मीडिया अकाऊंटशी ध्रुव राठी याचा काहीरी संबंध नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिनं परीक्षा न देता यूपीएससीमध्ये यश मिळवलं, अशा आशयाच्या पोस्ट ध्रुव राठी पॅरडी अकाऊंटवरुन करण्यात आल्या होत्या. या खात्यासंदर्भात एकूण 9 पोस्टच्या लिंकचा आधार घेत ध्रुव राठी पॅरडी या अकाऊंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार बदनामी, जाणीवपूर्वक अपमान, शांततेचा भंग करणे, चुकीची माहिती देणारी वक्तव्य करणे यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्रुव राठी काय म्हणाला?
ध्रुव राठीनं ज्या ट्विटर अकाऊंटवर गुन्हा दाखल झालाय ते पॅरडी अकाऊंट आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. संबंधित माध्यमानं सखोल तपास करण्याची गरज असल्याचं देखील ध्रुव राठी म्हणाला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.