देश
Corona : राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता
महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहाता. राज्यात प्रथम काही निर्बंध लावण्यात आले. त्यानंतर सरकारने या नियमावलीत बदल करुन निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला. परंतु तरीही गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आणखी काही उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र मंत्री मंडळाची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाऊनवर गंभीर चर्चा केली गेली.
असलम शेख यांच्या वक्तव्यानुसार १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहे. सध्याची परिस्थिती पाहाता १५ दिवस लॉकडाऊन लावावा अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे आणि त्यानुसार सरकार आता १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करु शकते.
आरोग्यमंत्री राजेश टोपें यांनी सांगितले की, उद्या रात्री 8 वाजल्यापासून हा कडक लॅाकडाऊन लावला जाईल अशी शक्यता आहे आणि मुख्यमंत्री या बद्दलचे वक्तव्य देतील. तसेच 10वी ची परीक्षा रद्द् करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. वर्षा गायकवाड या बद्दल अधिकृत घोषणा करतील असे ते म्हणाले. परंतु बारावीच्या परीक्षा या होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. त्याच बरोबरो लसीकरण करण्यावरती महाराष्ट्र शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची परिस्थिती चिंता करणारी आहे. त्यामुळे राज्यात 144 कलम लागू करत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीचे नियमही अनेकांकडून पाळले जात असल्याने लॉकडाऊनचा विचार पुढे येत आहेत. दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्रात भयावह परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर दिसून येत आहे. (highest Coronavirus mortality rate in Western Maharashtra)
राज्यात काल 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात काल 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56 टक्के एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत आहे. सध्या कोरोना रुग्णांची 38,40,000 इतकी संख्याआहे. या पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 10,14,000 आहे आणि राज्यात एकूण 27 टक्के रुग्ण आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 16,535 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 60, 473 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.