Chhattisgarh Election Result 2023: सर्वात लक्षवेधी निकाल! दंगलीत लेक गमावला; मजूर बाप निवडणूक लढला, ७ टर्म आमदाराचा पराभव
लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तीन राज्यांमध्ये भाजपनं विजय मिळवला. यातील दोन राज्यं काँग्रेसकडे होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत २०१८ मध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्या तिन्ही राज्यांत भाजपनं यंदा दणदणीत विजय मिळवला.
राजस्थानात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो. त्यामुळे तिथे भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित होतं. मध्य प्रदेशातही भाजपची स्थिती चांगली होती. पण छत्तीसगडमध्ये भाजपती सत्ता येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. विशेष म्हणजे सर्वच एक्झिट पोल्स राज्यात काँग्रेस सरकार कायम राहणार असल्याचा दावा करत होते. गेल्या ५ वर्षांत अनेक पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस वरचढ ठरली. त्यामुळे छत्तीसगड काँग्रेससाठी सुरक्षित गड बनला होता. पण भाजपनं काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला आणि ९० पैकी ५४ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावं लागलं.

एप्रिल २०२३ मध्ये साजा विधानसभा मतदारसंघात दंगल उसळली. एका शाळेत झालेल्या मारहाण प्रकरणानं धार्मिक वळण घेतलं. हिंसाचार उसळला आणि त्यात ३ जण मारले गेले. त्यात इश्वर साहूंचा मुलगा भुवनेश्वर साहूंचा समावेश होता. बघेल सरकारनं साहू कुटुंबाला १० लाख रुपये आणि सरकारी नोकरी देऊ केली. पण साहूंनी नकार दिला. त्यानंतर भाजपनं त्यांना विधानसभेचं तिकिट दिलं.