देश
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचं शव पुरलं जाणार, कुटुंबीयांनी घेतला निर्णय
बदलापूर अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी अक्षय शिंदेच्या शवाचे जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. अशातच आज अक्षय शिंदेच्या शवाबाबत त्याच्या वडिलांच्या वकिलांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून त्याचे शव पुरले जाणार आहे.
अक्षयला न्याय मिळावा अशी कुटुंबियांची मागणी
अॅड अमित कटारनवरे म्हणाले की, ” अक्षय शिंदेचे शव पुरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात जर काही पुरावे लागले तर त्याचे शव पुन्हा बाहेर काढण्यात येईल. अक्षयचे शव पुरण्यासाठी जागा देत नाही. आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे. अशी त्याच्या कुटुंबियांची भावना आहे. यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अक्षयच्या शवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात केली होती. यावर सरकारी वकिलांनी त्यांना सरकार जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. आम्ही महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून देऊ. असं आश्वासन सरकारी वकिलांनी दिलं आहे.