अपराध समाचार
अश्लील मॅसेज आणि छळाच्या आरोपाखाली अभिनेता एजाज खानला अटक
- 375 Views
- November 20, 2016
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
बिग बॉसनंतर चर्चेत आलेला अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एजाजवर अश्लील मॅसेज, फोटो पाठवण्याचा आणि छेड काढण्याचा आरोप आहे. मॉडल ऐश्वर्या चौबे हिने हे आरोप केले आहेत. ऐश्वर्या ही काश्मीरची राहणारी असून ती स्वत:ला सलमानची फॅन असल्याचं सांगते.
एजाजने याला त्याच्याविरोधात असलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. मुंबई-पुण्यात माझे शत्रू आहेत. ते लोकं हे करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण त्याने कोणाचं नाव नाही घेतलं.
मॉडल ऐश्वर्या चौबे हिने वर्सोवा पोलीस स्थानकात एजाज विरोधात तक्रार दाखल केली आहे. एका दिवशी एजाजने तिला जुहूच्या एका हॉटेलमध्ये बोलवण्याचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप लावला आहे.
Share this: