देश
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणेंचे निधन
- 132 Views
- April 07, 2014
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
सोमवार ७ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम मुंबई, दि. ७ – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. मुलुंडमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आपले आयुष्य देशसेवेला वाहण्याचा निर्णय घेणारे ताम्हाणे १९२८ मध्ये सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या निमित्ताने स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ताम्हाणेंनी तुरुंगवासही भोगला. त्यांनी जंगल कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला, तसेच गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला होता. सत्याग्रह, आंदोलने, चळवळी, राजकारण, समाजकारण असे त्यांचे जीवन होते. देशातील स्वात्यंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडाचे ताम्हणे प्रमुख साक्षीदार होते. सत्याग्रह, आंदोलनं, चळवळी, राजकारण, समाजकारण असे त्यांचे ध्येयासक्त जीवन होते.