देश,राजनीति
पालघरमधून काँग्रेसची माघार
रविवार ६ एप्रिल २०१४ – लोकसभेची लढाई : बहुजन विकास आघाडीला पाठिंबा मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याची कुणकुण लागताच कोणत्याही स्थितीत तसे होऊ नये, यासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देऊ केला. शनिवारी सकाळी या घडामोडी घडल्या. राजेंद्र गावित हे राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. पालघरमधून काँग्रेसने उमेदवारी द्यावी, यासाठी त्यांचा तसेच मुझफ्फर हुसेन यांचा आग्रह होता. मात्र पालघर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना १७, राष्ट्रवादी १0 आणि काँग्रेस १ अशी पक्षाची अवस्था होती. त्यात हितेंद्र ठाकूर यांना काँग्रेसने हाताच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची गळ घातली, मात्र त्यांनी नकार दिला. तिरंगी लढत झाली तर भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असा अहवाल पक्षाकडे आला. काँग्रेसने गावित यांना अद्याप एबी फॉर्म दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हितेंद्र ठाकूर यांना वर्षावर भेटीसाठीबोलावले. त्या वेळी श्रेष्ठींचे काही निकटवर्ती उपस्थित होते. आम्ही तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो आणि आमची उमेदवारी मागे घेतो, असा शब्द या वेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकूर यांना दिल्याचे समजते. (प्रतिनिधी) सहयोगी भूमिकेची दखल ! च्बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य म्हणून संसदेत बसत असत व पक्षाच्या प्रत्येक धोरणाला त्यांचा पाठिंबा मिळत असे. या सर्व बाबींचा विचार करून काँग्रेसच्या पक्षo्रेष्ठींनी निर्णयात बदल केल्याचे सूत्राने सांगितले. च्मतदारसंघात मतविभागणी होऊन भाजपाला त्याचा फायदा होईल, त्यामुळेच काँग्रेस पक्षाने ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडली. आज मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.